मकर संक्रांती 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti
.jpeg)
मकर संक्रांती 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti Makar Sankranti utsava नमस्कार वाचकांनो 🙏, आज पुन्हा एकदा तुमच्या समोर नवीन लिखाण घेवून मी आलो आहे.आजचे लिखाण तसे खास म्हणावं लागेल कारण इंग्रजी नवीन वर्षात येणारे मकर संक्रांती हा पहिला सण असतो त्यामुळे त्याला नेहमीच विशेष असे महत्त्व असते.आजच्या लिखाणात संक्रांत सणाची माहिती किंवा आपण २०२४ या वर्षीची मकर संक्रांत कशाप्रकारे साजरी करायची आहे हे बघणार आहोत. मंडळी आजच्या या Makar Sankranti 2024 Marathi Mahiti लेखामध्ये आपण मकर संक्रांत कशावर आली,त्याचबरोबर संक्रांत कसे साजरी करायची याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती 2024 | Sankranti 2024 marathi information नव्याने सुरू झालेल्या ह्या नवीन वर्षात मकर संक्रांती १५ जानेवारी २०२४ या दिवशी साजरी केली जाणार आहे.मकर संक्रांत ही नेहमी १४ किंवा १५ जानेवारीला या दोन तारखांना साजरी होत असते परंतु मागील दोन वर्षापासून मकर संक्रांती ही १५ जानेवारी या दिवशी साजरी केली जात आहे. संक्रांत हे प्रत्येक महिन्याला साजरी होत असते परंतु मकर संक्रांत ही सूर्याचे धनु र...