ABOUT US

 आमच्याबद्दल

 

माझ्या वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजकाल खूप धकाधकीचं जीवन आपण जगत आहोत.रोज आयुष्यात प्रत्येकाला नव-नवा संघर्ष करावा लागतो. या कारणास्तव वाचन पासून आपण दुर जात आहोत.वाचना शिवाय मानसिक आरोग्य/स्वास्थ्य निरोगी राहणे कदापि शक्य नाही.खूप लोक शाळा, कॉलेज किंवा ऑफिस मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. माझे काही प्रिय बंधू आणि भगिनी तर १-२ तासांचा प्रवास रोजच करतात. अशावेळी ह्या देखील वेळेचा उपयोग करून घ्यावा असं सर्वांनाच वाटतं.त्याच साठी या वेळात नव-नविन माहिती वाचकांना प्राप्त व्हावी या साठी केलेला हा लेखन प्रपंच.

वाचाल तर वाचाल हि म्हण सर्वांनी ऐकली हि असेल आणि खरंच सांगायचं तर वाचन हा सगळ्या समस्यांवर वर एक प्रभावी उपाय आहे असे मला जाणवते. मग तुम्ही कुठल्याही माहितीचे वाचन करा,पुस्तक वाचा,धार्मिक ग्रंथ वाचा, कथा-मालिका वाचा, वाचन ही एक अशी सवय आहे ज्यामुळे मनात असलेलं विचारांचं वादळ कुठेतरी बंद होतं.

माणूस वाचनाने वैचारिक श्रीमंत होतो.ते म्हणतात ना ध्यान आणि ज्ञान कधीही वाया जात नाही आणि वाचनातून ह्या दोन्ही गोष्टी आपणास आत्मसात करता येतात.

वरील लेखन बाबत, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबाबत तुम्हाला काही प्रश्न अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता

धन्यवाद 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदाची गुरुकिल्ली