मकर संक्रांती 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti
मकर संक्रांती 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti
![]() |
| Makar Sankranti utsava |
नमस्कार वाचकांनो 🙏,
आज पुन्हा एकदा तुमच्या समोर नवीन लिखाण घेवून मी आलो आहे.आजचे लिखाण तसे खास म्हणावं लागेल कारण इंग्रजी नवीन वर्षात येणारे मकर संक्रांती हा पहिला सण असतो त्यामुळे त्याला नेहमीच विशेष असे महत्त्व असते.आजच्या लिखाणात संक्रांत सणाची माहिती किंवा आपण २०२४ या वर्षीची मकर संक्रांत कशाप्रकारे साजरी करायची आहे हे बघणार आहोत. मंडळी आजच्या या Makar Sankranti 2024 Marathi Mahiti लेखामध्ये आपण मकर संक्रांत कशावर आली,त्याचबरोबर संक्रांत कसे साजरी करायची याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
मकर संक्रांती 2024 | Sankranti 2024 marathi information
नव्याने सुरू झालेल्या ह्या नवीन वर्षात मकर संक्रांती १५ जानेवारी २०२४ या दिवशी साजरी केली जाणार आहे.मकर संक्रांत ही नेहमी १४ किंवा १५ जानेवारीला या दोन तारखांना साजरी होत असते परंतु मागील दोन वर्षापासून मकर संक्रांती ही १५ जानेवारी या दिवशी साजरी केली जात आहे. संक्रांत हे प्रत्येक महिन्याला साजरी होत असते परंतु मकर संक्रांत ही सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवण्याचे कार्य करते त्यामुळे हि वर्षातली सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते.
१५ जानेवारी २०२४ या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. दिनांक १५ जानेवारी २०२४ या दिवशी मध्यरात्रीपासून २.४२ मिनिटांनी मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे. म्हणूनच उदय तिथीनुसार मकरसंक्रांत हे १५ जानेवारी २०२४ या दिवशी साजरी होणार आहे.आता उदय तिथी म्हणजे काय तर उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्य देवाचे तोंड बघते अशा तिथीला उदय तिथी असे म्हटले जाते.
मकर संक्रांती ची संपूर्ण माहिती
makar sankranti 2024 marathi mahiti
- दिनांक १४ जानेवारी २०२४: – या दिवशी धनुर्मास समाप्ती असून भोगी हा सण साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते त्याला शेंगा वांग्याची भाजी असे म्हणाले जाते.बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनविले जाते. मिश्र भाजी सोबत बाजरीच्या भाकरी तीळ दाणे लावून बनविले जातात.
- दिनांक १५ जानेवारी २०२४ :– मकर संक्रांती संक्रमण पुण्य काळ सकाळी ०७.१७ ते सायंकाळी ०६.२० पर्यंत आहे
- दिनांक १६ जानेवारी २०२४:- १६जानेवारी २०२४ या दिवशी किंक्रंत साजरी केली जाणार आहे. किंक्रांत ज्या दिवशी असते त्या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही. किंक्रांत ला “करी दिवस” असे देखील म्हटले जाते.
- मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे पाच उपाय घरामध्ये येईल सुख,समृद्धी…
मकर संक्रांति 2024 तारीख | Makar sankranti 2024 date and time
दिनांक १५ जानेवारी २०२४ – “१५जानेवारी २०२४” ह्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येणार आहे.त्या दिवशी तिळगुळाचे गोड पदार्थ बनविले जातात. एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळाचे देवाण-घेवाण करण्यात येते आणि त्यासोबत “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे देखील म्हटले जाते.
मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी द्या हे वाण
संक्रांत 2024 कशावर आहे? | sankranti kashavar ali 2024 in marathi
प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे सामान्यपणे बदलत असते.२०२४ या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे तर उपवाहन हे हे सिंह असणार आहे.त्याचबरोबर काय वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टीका आहे.वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महो-दरी आहे.संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल नैऋत्य दिशेकडे बघत आहे.
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?
जाणून घ्या मकर संक्रांतीचे महत्व..अशाप्रकारे पूजा केल्यास..| Makar sankranti information in marathi
मकर संक्रांती म्हणजे काय? Makar sankranti information in marathi
बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मकर संक्रांती म्हणजे काय?
वाचकांनो तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत असते. हे राशी परिवर्तन जे घडत असते या प्रक्रियेला “संक्रांत” असे म्हटले जाते. अशी प्रक्रिया करत करत बारा महिन्यांमध्ये बारा संक्रांती येतात त्यामध्ये मकर संक्रांत हे सर्वात मोठी असते. संक्रांती म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणे होय. तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजेच “मकर संक्रांत” होय.
Makar Sankranti 2024 Marathi Mahiti
हिवाळ्यामध्ये साजरा होणारा मकर संक्रांत हा सण अगदी हिवाळ्याच्या सरते शेवटी शेवटी येतो.नववर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. २०२४ या वर्षी मकर संक्रांत १५ जानेवारी २०२४ या दिवशी साजरी होणार आहे.
![]() |
| Surya devo pooja |
- या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम पवित्र नदीपात्रात चांगल्या भावनेने स्नान करण्यात येते.
- स्नान केल्यानंतर शुभ्र आणि नवीन वस्त्र घालण्यात येते.
- एका तांब्याच्या पात्रात शुद्ध गंगाजल घ्यायचं आणि त्यामध्ये काळी तिळाचे दाणे टाकायचे.
- हे पवित्र जल सूर्य देवाला अर्पण करायचे.
- या दिवशी खिचडी चे दान करावे.
पतंग महोत्सव/Kite festival/Makar Sankranti 2024
मकर संक्रात या सणाच्या दिवशी शहरी भागात प्रामुख्याने पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते.विविध धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते. प्रामुख्याने गुजरात या राज्यात ह्या पतंग महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असते
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाचे उत्तरायण होते यामुळे सूर्य देवाची पूजा केल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात.यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच सूर्य देवाची पूजा करा, यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी, शांतता,भरभराट यांचा वास होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते, त्याचबरोबर असे केल्यास आपण केलेले विशिष्ट प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते.
.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा