आनंदाची गुरुकिल्ली
आनंदाची गुरुकिल्ली / ANANDACHI GURUKILLI /KEY TO HAPPINESS
आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे 'मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करणे. याच्या पलीकडील आयुष्य हे खूप सुंदर आहे एकदा का असा विचार आपल्या मनात रुतला की,मग आनंदी आनंदच! आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्या अंतरंग मध्येच आपण शोधायला हवा.जेणे करून आनंदी राहण्यासाठी आपणाला कुणा बाह्य गोष्टीवर अवलंबून न रहावे लागेल.जरी काही व्यक्तींना प्रथम दर्शनी आनंद हा बाह्य गोष्टीत असे जाणवत असले तरी ते बाह्य गोष्टीतून कधीच आनंदी होत नाहीत.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात ताण-तणाव वाढलेला दिसतो. मग या गोष्टी पासून समाजातील कुठलाच घटक सुटलेले नाही.अगदी लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सारेच आज ह्या ताण- तणावाच्या कचाट्यात आहेत.यावरती एक मात्र उपाय आहे तो म्हणजे आनंद. तो असेल तर नक्कीच आपल्या अर्ध्याहून अधिक समस्या सहज सुटतात.आनंदी राहणे हे सभोवतालच्या परिस्थिती बरोबरच आपल्या स्वत:वरही अवलंबून असते. किंबहुना जास्त आपल्यावरच अवलंबून असते. आपण इतरांशी स्वतःची तुलना करणे, ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, असा आपण विचार करत राहणे अशा गोष्टींचा फार विचार करून आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणूनच आपण आनंदी राहण्याची काही सूत्रे पाहू.
आनंदी राहण्याची सूत्रे:-
• आनंदाचा आदर करा:-
आनंदाची परिभाषा प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलते.एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट करून जर आनंद मिळत असेल तर दुसऱ्याला त्या गोष्टी पासून आनंद मिळेलच असे नसते त्यामुळे आपण प्रतेकाच्या आनंदाचा आदर करायला शिकायला हवे.
• छंद जोपासा:-
ते म्हणतात ना प्रत्येकाला एक ना एक तरी छंद असावा. त्या छंदा मध्ये वाचन,लेखन,भ्रमण,वकृत्व अश्या खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होतो.छंद माणसाला आनंदी ठेवण्यात निश्चितच फायद्याचे ठरतात. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी छंद जोपासावा.
• सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:-
समाधानी राहा. आयुष्यात सारेच मनाप्रमाणे घडत • नाही, त्यामुळे हे सत्य स्वीकारा.भूतकाळ आणि भविष्यकाळ या विचारात न अडकता वर्तमानात जगायला शिका.सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
• स्वतःवर जबाबदारी घ्या:-
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळे ह्या चांगल्या वाईट गोष्टींची तसेच यश-अपयशाची जबाबदारी स्वतः वरती प्रत्येकाने घेतली पाहिजेन. त्यासाठी इतरांना दोषी ठरवू नका.
• घटना स्मरणात ठेवा:-
प्रत्येकाच्या रोज नवं-नवीन घटना घडत असतात.आयुष्यात घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चांगल्या घटनांना नेहमी आठवत राहा.त्या घटना पासून शिकून त्याचे विनियोग आयुष्यात करा.
• इतरांचे दुःख समजून घ्या:-
आपले दुःख, त्रास याचा बाऊ करू नका. इतरांचे दुःख, त्रास समजून घ्या त्यामुळे आपले दुःख आपल्याला किती कमी आहे याची जाणीव होईल. याचा उपयोग आपणास आपले दुःख सहन करण्यास होईल.
• इतरांच्या आनंदात सहभागी व्हा:-
आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. त्याच बरोबर इतरांच्या आनंदाच्या क्षणात मुक्त मनाने सहभागी होवून जा.इतरांशी आपली तुलना करू नका.
• सतत नावीन्याचा शोध घ्या.
जग हे खूप नवीनतेने भरलेले आहे त्यामुळे आपण नेहमी ह्या घडणाऱ्या गोष्टींपासून नवीन काही तरी शिकून त्याचा उपयोग आपले दैनंदिन आयुष्य आनंदी व समाधानी करण्यासाठी केला पाहीजेन.हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार गरजेचं आहे.
• स्वतःच्या क्षमता ओळखा.:-
स्वतःवर विश्वास ठेवा.स्वतःच्या क्षमतांची ओळख करा.त्या क्षमतावर्ती काम करा त्यांना अजून क्षमता पूर्ण करा. पूर्ण क्षमतेने मेहनतीने काम करा त्यामध्ये आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करा त्यामुळे आपण आनंदी होतोच.
• जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा:-
प्रत्येकाच्या आयुष्यात उदासी ही येत असते.ह्या उदासीच्या वेळी आपल्या विश्वास मधल्या जवळच्या व्यक्तीशी बोला, त्याच्या समोर व्यक्त व्हा किंवा शांत आवडत्या ठिकाणी फेरफटका मारा, संगीत ऐका..
जगण्याचा भरभरून आनंद घेणे आपल्यावरच अवलंबून असते. आनंद हा मानसिक क्रिया आहे.आनंदी राहणे हे व्यक्ती परत्वे बदलत असते,कोणतेही काम करत असाल तर ते काम योग्य प्रकारे चांगले होण्यासाठी आपण स्वतः आनंदी असायला हवे.स्वतः आनंदी नसून केलेले कार्य कधीही योग्य रीतीने होत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा